विधानसभा निवडणुका जाहीर होताच राज ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले “सर्व पक्षांपेक्षा…”

विधानसभा निवडणुका जाहीर होताच राज ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले “सर्व पक्षांपेक्षा…”

Raj Thackeray on Maharashtra Assembly Election Seats : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. आज राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका पाहायला मिळणार आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत, असे विधान राज ठाकरे यांनी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने लढवणार याबद्दल भाष्य केले. विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नक्कीच सत्तेत असेल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

जाहीरनामा लवकरच येणार

“मी माझ्या सभेत त्या दिवशी सांगितलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नक्कीच सत्तेत असेल, हे मी फक्त कार्यकर्त्यांना उत्साह यावा यासाठी बोललो नाही. जाहीरनामा लवकरच येईल. त्यात काय असेल हे तेव्हाच समजेल”, असे राज ठाकरेंनी म्हटले.

मी युती आघाडीबद्दल काहीही बोलणार नाही

यावेळी राज ठाकरेंना किती जागा लढवणार, युती किंवा आघाडीत जाणार का याबद्दलही विचारणा करण्यात आले. त्यावरही त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. “सर्व राजकीय पक्षांपेक्षा सर्वात जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत. किती काय हे तुम्हाला समजेल. लढवायच्या म्हणून लढवत नाही. २०१४ ला लढवल्या. २००९ लाही लढवल्या. मी युती आघाडी बद्दल आता काहीही बोलणार नाही. मी जे बोललो ते बोललो”, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मनसेने काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात मुंबईसह महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

मनसेच्या उमेदवारांची यादी
1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर
2. पंढरपूर – दिलीप धोत्रे
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. वणी – राजू उंबरकर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;