लाडकी बहीण योजना अन् सरकारच्या कामाचा लेखाजोखा; अजित पवारांनी मांडलं ‘रिपोर्टकार्ड’

लाडकी बहीण योजना अन् सरकारच्या कामाचा लेखाजोखा; अजित पवारांनी मांडलं ‘रिपोर्टकार्ड’

मेजर गोष्टी रिपोर्टकार्डमध्ये आहे. क्रीडा, सांस्कृतिक विकास, ग्रामिण विकास आणि रोजगार या सर्व गोष्टी आम्ही समाविष्ट केल्या आहेत. दोन अडीच वर्षाच्या कामगिरीचा अहवाल आम्ही देत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात आणलेल्या बदलाचा हा अहवाल. शेतकरी, महिला, कष्टकरी या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मेहनत घेतली. त्याचा लेखाजोखा आम्ही मांडत आहोत. आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचं काम करत आहोत. आम्ही जनतेचं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला, असं अजित पवार म्हणालेत.

अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

आमचे विरोधक गडबडलेले आहेत. घाबरलेले नाही म्हणणार, लाडकी बहीण योजनेमुळे ते गडबडले. ही योजना लागू होणार नाही असं म्हणायचे. फॉर्म रिजेक्ट होतील असं म्हणणार नाही. अडीच कोटी दिले आम्ही. महिलांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे ही योजना निवडणुकीपर्यंत असेल असं सांगितलं जात आहे. पण सीएम डीसीएमच्या साक्षीने सांगतो आम्ही पैशाची तरतूद केली आहे. ही योजना तात्पुरता नाही. निवडणुका येतील जातील. दर पाच वर्षाने ते होते. पण तुमचे पैसे ठरले आहेत. ते कोणी काढून घेणार नाही. या योजनेतील पैशात वाढ करण्याचं सुतोवाच सीएमने केलं आहे. आम्ही योग्य मांडणी करून ही योजना लागू करत आहे, असं अजित पवार म्हणालेत.

लाडकी बहीण योजनेवर अजित पवार काय म्हणाले?

सुशील कुमार शिंदे यांनी वीज बिल माफ केलं. नंतर पुन्हा सुरू केलं. आम्ही अशा गोष्टी करणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. आम्ही राज्यातील जनतेला तसा विश्वास देतो. आमच्या बऱ्याच योजना आहेत. महायुती सरकार काम करणारं आहे. आमच्या कामाच्या जोरावर आम्ही रिपोर्ट कार्ड देत आहोत, असं अजित पवार म्हणालेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;