मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

निवडणुकीची घोषण्या होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केलाय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षी २६००० रुपये बोनस म्हणून देण्यात आला होता.  बालवाडी शिक्षक आणि आशा वर्कर्स यांनाही बोनस मिळणार आहे.

राज्यसभा खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल लेबर युनियनने बीएमसी कर्मचाऱ्यांना 40,000 रुपये बोनस म्हणून देण्याची मागणी केली होती. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 नोव्हेंबर रोजी बीएमसी कर्मचाऱ्यांना 26,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला होता. जो यंदा तीन हजाराने वाढवण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेस खासदाराच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा जागेवपही २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 4.97 कोटी पुरुष, 4.66 कोटी महिला आणि 20.93 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;