तुतारीसारखं दिसणारं चिन्ह नको…शरद पवार गटाच्या मागणीवर निवडणूक आयोगाचं उत्तर काय?

तुतारीसारखं दिसणारं चिन्ह नको…शरद पवार गटाच्या मागणीवर निवडणूक आयोगाचं उत्तर काय?

राज्यातील विधान सभा निवडणूकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. राज्यातील दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होणार असल्याने याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  तुतारी आणि पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे पिपाणी चिन्ह गोठवण्याची शरद पवार गटाची मागणी होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या या मागणीवर देखील निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण केलेले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा कार्यक्रम निव़डणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिलेली आहे. यावेळी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुक कायक्रम जाहीर करण्याच्या आधी निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांचा दौरा केला होता.त्यावेळी विविध राजकीय पक्षांशी चर्चा देखील केली होती. यावेळी काही राजकीय पक्षांनी त्यांच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. यावर निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण केले आहे.

निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला पक्ष फूटीनंतर निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलेले आहे. या निवडणूक चिन्हाबाबत दोन शरद पवार गटाने दोन विनंती केल्या होत्या. त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली आहे. पहिली विनंती होती की त्याचं चिन्हं योग्य नाही. ते मतपत्रिकेवर छोटं दिसतं.तसचे दुसरी विनंती केली होती की तुतारी सारखं दिसणारं दुसरे चिन्हं हटविण्यात यावे. यावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की आम्ही त्यांची पहिली विनंती मान्य केली आहे.त्याची योग्य दखल घेतली आहे. ते पुढे म्हणाले की त्यांना तुतारी चिन्ह कसं दिसलं पाहिजे हे आम्ही त्यांना विचारलं. त्यांनी आम्हाला सांगितलेला आकार आम्ही  मान्य केला आहे .दुसरं चिन्ह Trumpet हे सेम नाही. असं आम्ही त्यांना सांगितले आहे असेही आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तुतारी आणि पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी सारख्या दिसणाऱ्या पिपाणी चिन्हाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;