निवडणुकीआधी शरद पवारांचा अजितदादांना पुन्हा मोठा धक्का; दोन नेत्यांचा पक्षप्रवेश निश्चित

निवडणुकीआधी शरद पवारांचा अजितदादांना पुन्हा मोठा धक्का; दोन नेत्यांचा पक्षप्रवेश निश्चित

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढच्या महिनाभरात निवडणूक प्रक्रिया पार पडेल. पण त्याआधीच शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील नुकतंच शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत.

राजेंद्र शिंगणेंचा प्रवेश निश्चित

बुलढाण्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांची साथ सोडणार आहेत, अशी माहिती मिळते आहे. राजेंद्र शिंगणे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एका नेत्याने प्रवास केला होता. यावेळी फाईलने त्यांनी चेहरा झाकला होता. सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवास करणारा नेता म्हणजे राजेंद्र शिंगणे… आता राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याचं कळतं आहे.

उनेश पाटील शरद पवारांच्या भेटीला

अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. उमेश पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. उमेश पाटील शरद पवारांच्या घरी जात असताना त्यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. मी राजकारणात आल्यापासून मोहोळमधील हुकुमशाहीला विरोध आहे. शरद पवारांसोबत असल्यापासून माझा या हुकुमशाही आणि दडपशाहीला विरोध आहे. त्याच मुद्द्यावर शरद पवारांसोबत बोलण्यासाठी मी इथं आलो आहे, असं उमेश पाटील म्हणाले.

शरद पवार गटात प्रवेश करणार का? या प्रश्नावर थेट उत्तर देणं उमेश पाटील यांनी टाळलं. आधी मी शरद पवारांची चर्चा करतो, असं ते म्हणाले. मी अजित दादांवर नाराज नाही. साहेबांना भेटणं हे भाग्य आहे. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी आलोय, असंही उमेश पाटील म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;