कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; महायुतीची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता
कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतं बिगुल वाजणार आहे. येत्या एक ते दोन दिवसात महाराष्ट्रात आचारसंहिता लागू शकते. अशातच सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागलेत. जागावाटपांसाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. अशातच आता महायुतीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. आज दुपारी महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
100 जागांवर भाजपची नावं निश्चित
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अमित शाहांसोबत चर्चा केल्यानंतर संपूर्ण जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या 100 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काही जागांवर महायुतीत अदलाबदल होऊ शकते.
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महायुतीने नावं पाठवली
राज्यपाल नियुक्त 12 जागांबाबत महायुतीने नावं पाठवल्याची माहिती आहे. 12 पैकी 7 जागांसाठी महायुतीने नावं राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती आहे. भाजपचे 3, शिवसेना शिंदे गट 2 तर अजित पवार गटाकडून 2 नावं पाठवल्याची माहिती आहे. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील यांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List