मोठी बातमी ! जागा वाटपावरून महायुतीत वाद? रामदास आठवले काय म्हणाले?

मोठी बातमी ! जागा वाटपावरून महायुतीत वाद? रामदास आठवले काय म्हणाले?

बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हल्ल्याच्या घटना अचानक घडतात.माझ्यावर देखील दोन वेळा हल्ला झाला होता. गुप्तचर यंत्रणा ऍक्टीव्ह असली पाहिजे. कुणाचं ही राज्य असलं तरी अशा घटना घडू नयेत.विरोधकांनी या घटनेवरून आता राजकारण करू नये. त्यांच्या ही कार्यकाळात अशा घटना घडल्या आहेत.नेमक्या कुठल्या कारणावरून आणि कुणी सुपारी दिली होती, याचा तपास पोलीस करत आहेत असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. महायुतीतून सुरु असलेल्या जागा वाटपावरूनही त्यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. काय म्हणाले रामदास आठवले ते पाहूयात…

मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. ही मागणी सर्वात आधी मी केली होती असेही रामदास आठवले यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की 8 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील कुटुंबाला आरक्षण मिळावं ही आमची सातत्याने मागणी आहे. परंतू मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे कठीण आहे. कमिटी आणि कोर्ट मान्य करणार नाही असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की ओबीसींमधून दुसरी कॅटगिरी करून त्यात मराठा समाजाला टाकले पाहिजे. तसे आरक्षण महाराष्ट्रात मिळू शकते. पण, हे महाराष्ट्र पुरते मर्यादित ठेवू शकणार नाहीत. देशभरातील जाट, क्षत्रिय यांना देखील अशा पद्धतीने आरक्षण द्यावे लागेल. माझे मराठा आणि ओबीसींना एकच सांगणं आहे की एकमेकांचा द्वेष करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे एकोप्याने राहावे. भुजबळ आणि जरांगे यांच्यात नेहमीच सामना असतो. त्यांनी यातून मार्ग काढला पाहिजे असेही आठवले यांनी म्हटले आहे.

महायुतीत जागा वाटपावरुन वाद

आम्हाला आठ ते दहा जागा हव्या होत्या. परंतू कमी जागा मिळाल्या तरी आपण दुसरा निर्णय घेणार नाही. महायुतीसोबत आपण लढणार आहे.जागा कमी जास्त होतील. तिन्ही पक्षामध्ये जागावाटपावरुन ( महायुती ) वाद विवाद सुरू आहेत. लवकरच जागा वाटपाचा हा तिढा सुटेल. भाजपासारख्या मोठ्या पक्षातून तिकीट मिळणार नसल्याने अनेक जण शरद पवार गटात जात आहेत.हर्षवर्धन पाटील हे त्याचं उदाहरण आहे.काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कुणीही जात नाही. पक्ष बदलणाऱ्यांना फार फायदा होणार नाही असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;