मुंबईत मॉब लिंचिंग, जमावाची युवकाला बेदम मारहाण, मुलाला जमावाकडून वाचवण्यासाठी आई पडली अंगावर पण…

मुंबईत मॉब लिंचिंग, जमावाची युवकाला बेदम मारहाण, मुलाला जमावाकडून वाचवण्यासाठी आई पडली अंगावर पण…

Mumbai Crime  News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे मुंबई हादरली आहे. मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच इतर आरोपींना पकडण्यासाठी १५ पथके तयार ठिकठिकाणी पाठवली आहे. मुंबईतील या गुन्हेगारी घटनेनंतर आता मॉब लिंचिंगचा प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरकोळ कारणावरुन जमावाने युवकाची हत्या केली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे.

काय घडला प्रकार

मुंबईत मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून जमावाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. गाडी ओव्हरटेक करण्यावरून त्याचा वाद झाला होता. त्यामुळे त्याला जमावाने बेदम मारहाण केली. आकाश माइन (वय २८) असे त्या मृत युवकाचे नाव आहे. मालाडच्या दिंडोशी भागात ही घटना घडली. आकाश माइन हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे.

रिक्षाचालकांकडून मारहाण

दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश कदम या ऑटोचालक आणि आकाश माईन यांच्यात वाद झाला. आकाश हा दुचाकीवर होता. तर अविनाश कदम हा रिक्षाचालक आहे. ओव्हरटेकवरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी इतर रिक्षाचालकही आकाशला मारहाण करण्यासाठी पोहचले. त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये आकाश जमिनीवर पडलेला दिसत आहे. तसेच जमाव त्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. फुटेजमध्ये आकाशची आई दीपाली त्याच्यावर झोपून आणि त्याला संरक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच आकाशचे वडील हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला आहे. आकाश हा मालाड पूर्व येथे राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना दसऱ्याच्या निमित्ताने भेटण्यासाठी गेला होता. टनेच्या वेळी आकाश पत्नीसोबत दुचाकीवर होता, तर त्याचे आई-वडील दुसऱ्या ऑटो रिक्षात होते. पोलिसांनी या प्रकरणी 9 आरोपींना अटक केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;