विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची दिवाळी भेट, एसटीची भाडेवाढ रद्द

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची दिवाळी भेट, एसटीची भाडेवाढ रद्द

MSRTC Ticket Hike Cancelled : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून घोषणा आणि योजनांची बरसात केली जात आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णयांचा सपाटा लावला जात आहे. मुंबईतील टोल नाक्यावरील हलक्या वाहनांचा टोल रद्द करण्याचा निर्णय सोमवारी राज्य शासनाने घेतला आहे. आता दरवर्षी दिवाळीत महिन्याभरासाठी एसटीची करण्यात येणारी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरकारने ही दिवाळी भेटच दिली आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा

दरवर्षी दिवाळीला अनेक लोक आपल्या घरी जातात. त्यासाठी लाखो लोक रेल्वेने तर लाखो लोक परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. तसेच बरेच जण सुट्यामुळे पर्यटनस्थळी फिरण्याचे नियोजन करतात. या दरम्यान झालेली गर्दीचा फायदा उचलत खासगी ट्रॅव्हल्सकडून भरमसाठ भाडेवाढ केली जाते. त्याचवेळी दरवर्षी एसटी महामंडळाकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. यंदाही ही भाडेवाढ 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान करण्याचे परिपत्रक काढण्यात आले. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जनतेची नाराजी निर्माण होऊ नये म्हणून भाडेवाढ रद्द करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही बसमध्ये भाडेवाढ नसणार

एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम यंदा जमा होणार नाही. एसटीला दिवाळीच्या काळात चांगले उत्पन्न मिळते. यावर्षीही उत्पन्न वाढीसाठी हा मार्ग स्वीकारला होता. परंतु आता भाडेवाढ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी भाडेवाढ लागू असणार नाही.

असे असते उत्पन्नाचे गणित

राज्य परिवहन महामंडळाला सध्या रोज 23 ते 24 कोटी रुपयांचे उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळतात. तसेच दिवाळीत करण्यात येणाऱ्या हंगामी भाडेवाढीमुळे त्यात अधिक 6 कोटी रुपयांची भर पडते. यामुळे दिवाळीच्या सुटीच्या काळातील महिन्यात महामंडळाचे उत्पन्न 950 ते एक हजार कोटी रुपये होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;