मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत; म्हणाले, शाळेत जाऊन सफाई…

मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत; म्हणाले, शाळेत जाऊन सफाई…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व बोलतात मुख्यमंत्री म्हणजे चिफ- प्रमुख असतो. मात्र मी म्हणतो की, मुख्यमंत्री म्हणजे सर्वसाधारण आणि सर्वांना भेटणारा… जुन्या शाळा महानगरपालिका 23 किसान नगर शाळा ही माझी शाळा होती. आम्ही आधी जाऊन साफसफाई करायचो. आमचे शिक्षक आता नाहीत. नाही तर त्यांना मला मुख्यमंत्री झालेलं पाहून त्यांना आनंद झाला असता. शाळा दत्तक घेण्यासाठी लोक येत आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही कोणाला फसवलं नाही खोटं बोललं नाही. कारण आम्हाला फेसबुक लाईव्ह करायचं नाही. लोकांना फेस करायचं आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

सरकार योजनांवर मुख्यमंत्री म्हणाले…

सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. त्यात आपल्याला टिकायचं आहे. विध्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आमच्यात स्पर्धा नाही. मात्र दोन वर्षा पूर्वी आम्ही बदल घडवला. स्पीड ब्रेकर आम्ही हटवले. लाडकी बहीण, भाऊ, शिक्षक योजना चालल्या पाहिजेत. ही तिजोरी जनतेची आणि शिक्षण सर्वांची आहे. जे देण्या सारखं ते दिलं पाहिजे. आपल्या लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली. त्या खाली सर्व योजना दबल्या आहेत. पण शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करणारं आणि शिक्षक मानधन जास्त देणार हे पहिलं सरकार आहे. देणारं सरकार आहे, मात्र तिजोरीकडे पाहायला लागतं, असं शिंदे म्हणालेत.

कोणाच्या डोक्यावर जास्त वजन ठेऊ नका. थोडा वेळा दया. महाविकास आघाडी सरकार वेळी आपण कितव्या नंबरवर होतो, आता आपण पहिल्या नंबरवर आहोत. आम्ही घेतले निर्णय याची तुलना करा अडीच वर्षी आणि सहा महिन्याचं होऊ दे दूधच दूध पाण्याचं पाणी… याचा चार चाकी सरकार आहे मात्र पैसे सुटत नव्हते. पण आम्ही लोकांसाठी निर्णय घेतले, असं शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडीला आव्हान

खरं म्हणजे वस्तूची त्यांनी विरोधकांनी ओळखलेली आहे. महायुतीने केलेलं काम यामुळे महायुतीचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री त्यांचा होणार नाही. त्यामुळे त्यांचा चेहरा ते सांगू शकत नाही. त्यांची स्पर्धा मुख्यमंत्रिपदासाठी नाही. विरोधी पक्षनेता पदासाठी आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा त्यांनी जाहीर करावा, असं आव्हानही एकनाथ शिंदेंनी दिलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;