मुंबईहून जाणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स उडवण्याची धमकी; ट्रिपल थ्रेटने विमानतळावर खळबळ

मुंबईहून जाणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स उडवण्याची धमकी; ट्रिपल थ्रेटने विमानतळावर खळबळ

मुंबई विमानतळावर आज प्रचंड खळबळ उडाली. इंडिगो एअरलाइन्सच्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या आधी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. त्यामुळे या फ्लाइटची दिल्ली विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. ट्रिपल थ्रेट मिळाल्याने मुंबई विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. फ्लाइट 6E 1275 मुंबईहून मस्कतला जात होती. दूसरी इंडिगो फ्लाइट 6E 56 मुंबईहून जेद्दाहला जात होती. या दोन्ही फ्लाइटला उडवून देण्याची धमकी आली होती.

या आधी सकाळी बॉम्बच्या धमकीनंतर मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटला दिल्ली विमानतळाच्या दिशेने नेण्यात आलं. एअर इंडियाची फ्लाइट सोमवारी पहाटे 2 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टहून निघालं होतं. त्यानंतर एक ट्विटवरून धमकी मिळाल्याने हे फ्लाइट दिल्लीत तातडीने उतरवण्यात आलं. आणि विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र विमानात काहीही नसल्याचं आढळून आलं आहे. फ्लाइट 6E 1275 मुंबईहून मस्कतला जात होती. दूसरी इंडिगो फ्लाइट 6E 56 मुंबईहून जेद्दाहला जात होती. या दोन्ही फ्लाइटला उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली.

अलर्ट मिळाला अन्…

त्यानंतर एअर इंडियाने एक निवेदन जारी केलं. 14 ऑक्टोबर रोजी मुंबईहून JFK साठी उड्डाण भरणारी फ्लाइट एअर इंडिया 119ला एक स्पेशल सेक्युरिटी अलर्ट मिळाला. आणि सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या आदेशानंतर ही फ्लाइट दिल्लीला डायव्हर्ट करण्यात आली. सर्व प्रवाशांना दिल्ली विमानतळावर उतरवलं. सुदैवाने कुणालाही काही झालेलं नाही, असं एअर इंडियाने म्हटलं आहे.

प्रवक्त्याची माहिती काय?

या दोन्ही विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा प्रोटोकॉलच्या नुसार दोन्ही विमानांना विमानतळापासून एका वेगळ्या परिसरात नेण्यात आले. संभाव्य धोका टाळण्यासाठी विमानाला वेगळ्या ठिकाणी उभं करण्यात आलं. त्यानंतर आम्ही एसओपी अंतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रक्रियेत संरक्षण टीम, बॉम्ब नाशक पथक आणि इतर एजन्सी सामील होत्या. विमानाची सखोल तपासणी केली जात आहे. कोणताही धोका होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे, असंही इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितलं.

आधीही धमक्या मिळाल्या

गेल्या महिन्यातच एअर इंडियाच्या एका फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. गेल्या महिन्यात फ्लाइटच्या वॉशरुममधील टिश्यू पेपरवर ही धमकी देण्यात आली होती. ही पहिलीच घटना नव्हती. यापूर्वीही फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून या धमक्या वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी त्या धमकीची गंभीर दखल घेऊन फ्लाइट डायव्हर्ट केलं जात आहे. त्यामुळे प्रवाशाना हकनाक त्रास होतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;