शिंदे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत धारावी पुनर्विकासाबाबत अत्यंत मोठा निर्णय
आज महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली या बैठकीत धारावी पुनर्विकासाबाबत अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील 125 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. देवनार डंपिंग ग्राऊंडची 125 एकर जागा धारावी प्रकल्पाला दिली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List