बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करुन तिसरा आरोपी कुठे-कुठे पळाला? तपासातून महत्त्वाची माहिती उघड

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करुन तिसरा आरोपी कुठे-कुठे पळाला? तपासातून महत्त्वाची माहिती उघड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप अशा दोन आरोपींना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. तर तिसरा आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता तिसऱ्या आरोपीचं नाव समोर आलं. शिवकुमार उर्फ शिव गौतम असं तिसऱ्या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी पोलिसांच्या हातून निसटला. पण तो गोळीबारातून कुठे-कुठे आणि कसा गेला? याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणातील आणखी चौथ्या आरोपीचं नाव समोर आलं आहे. चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान, तिसरा आरोपी कुठून कसा पळाला? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्धीकी यांची हत्या करून पळालेल्या आरोपी शिवानंद शेवटी पनवेलमध्ये दिसून आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा आरोपी ज्या-ज्या मार्गाने पळाला त्या-त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. आरोपीने वांद्रेहून रिक्षाने कुर्ला स्थानक गाठले. कुर्लाहून हार्बर ट्रेन पकडून आरोपी पनवेल स्थानकावर गेल्याचे तपासात समोर आले. सीसीटीव्हीचा माग काढत पोलिसांना तो शेवटी पनवेलमधील सीसीटीव्हीत आढळून आला आहे. पनवेलहून आरोपी एक्सप्रेसच्या मदतीने राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींच्या शोधासाठी उज्जैन (मध्यप्रदेश), हरियाणा, यूपी, दिल्ली या ठिकाणी गुन्हे शाखेची पथक गेली आहेत.

गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपीचं नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा चौथा आरोपी हा तीनही आरोपींना हँडल करत होता. हे चारही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र आले होते. त्याचवेळी झिशान सिद्दीकी यांच्या हत्येचा कट शिजल्याची माहिती आहे. कारण हे चारही आरोपी कत्तर जेलमध्येच बिश्नोई गँगच्या संपर्कात आले होते. त्यावेळी हत्येनंतर आरोपींनी प्रत्येकी 50 हजार रुपये वाटून घ्यायचं असं ठरलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;