Baba Siddique Death: बाबा सिद्दिकी प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली, पोलिसांचा हैराण करणारा खुलासा, दिली मोठी माहिती

Baba Siddique Death: बाबा सिद्दिकी प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली, पोलिसांचा हैराण करणारा खुलासा, दिली मोठी माहिती

Baba Siddique Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच तिसरा आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. आता या प्रकरणात असलेला चौथ्या आरोपीचीही ओळख पटली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व घटनाक्रम सांगितला. क्राईम ब्रँचचे डिसीपी दत्ता नलवाडे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सर्व माहिती दिली.

जीव धोक्यात घालून आरोपींना पकडले

मुंबई पोलिसांनी जीव धोक्यात घालून गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप नाम या दोन आरोपींना घटनास्थळावर पकडले. आरोपींनी गोळीबार केला तेव्हा बाबा सिद्धिकी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तीन पोलीस कर्मचारी होते. त्यावेळी एपीआय राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्यासोबतच्या इतर कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत दोन आरोपींना पकडले. त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे माहिती असतानाही पोलिसांनी ही कामगिरी बजावली. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात दोघांना अटक केली आहे. तसेच शिवा कुमार आणि मोहम्मद जासिन अख्तर फरार आहे. त्यांच्या शोधासाठी १५ पथके पाठवण्यात आले आहे.

आरोपींनी सोबत आणला होता मिर्ची स्प्रे

आरोपींकडून दोन पिस्तूल आणि २८ काडतूसे जप्त करण्यात आली आहे. या आरोपींनी आपल्यासोबत मिर्ची स्प्रे आणला होता. आधी आरोपी मिर्ची स्प्रे करणार होते. त्यानंतर गोळीबार करणार होते. परंतु तिसरा आरोपी शिव कुमार याने सरळ गोळीबार सुरु केला. पोलिसांना या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कट असल्याची शक्यता वाटत आहे. रविवारी कोर्टात पोलिसांनी ही भूमिकासुद्धा मांडली.

चौथा आरोपी जालंधरमधील

बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथा आरोपी मोहम्मद जासिन अख्तर हा 7 जून रोजी पटियाला कारागृहातून बाहेर आला होता. तो पंजाबमधील पटियाला जेलमध्येच लॉरेंस बिश्नोई गँगच्या संपर्कात आला होता. तो जालंधरमधील राहणार आहे. या हत्याकांडासाठी इतर तीन आरोपी 2 सप्टेंबर रोजीच मुंबईतील कुर्लात आले होते. त्यांनी त्या ठिकाणी 14 हजार रुपये महिन्याने घर भाड्याने घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून ते रेकी करत होते. तसेच गोळीबार करण्याची संधी शोधत होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;