बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली? बिश्नोई गँगचा पोस्टमधून मोठा खुलासा काय?

बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली? बिश्नोई गँगचा पोस्टमधून मोठा खुलासा काय?

Lawrence Bishnoi Took Responsibility Baba Siddique : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सध्या फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यामागे बिश्नोई गँग असल्याचा दावा करण्यात आला आहे. बिश्नोई गँगमधील एका सदस्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या करण्यात आल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

बिश्नोई गँगच्या सदस्याने केलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय?

ओम जय श्री राम जय भारत. मला जीवनाचा अर्थ माहिती आहे. मी शरीर आणि पैसा ही धूळ असल्याचे समजतो. मी जे केले ते चांगले काम होते. मी जे काही केले ते मैत्रीच्या धर्माचे पालन होते. सलमान खान आम्हाला ही लढाई नको होती. पण तू आमच्या भाईचे नुकसान केले आहे. आज बाबा सिद्दीकी किती चांगले होते, हे सांगितले जात आहे. पण एकेकाळी ते दाऊदसोबत मकोका कायद्याखाली होते.

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध. आमची कोणासोबतही दुश्मनी नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु. आमच्या गँगमधील कोणत्याही भाईला मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही प्रतिक्रिया नक्की देऊ. आम्ही याआधी कधीही वार केलेला नाही. जय श्री राम, जय भारत, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरु 

दरम्यान शुभ्भू लोनकर महाराष्ट्र या फेसबुक अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे. हे फेसबुक अकाऊंट बिश्नोई गँँगशी संबंधित असल्याचे बोललं जात आहे. या पोस्टद्वारे बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. सध्या पोलीस ही व्यक्ती कोण, काय करते याचा तपास करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;