बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, सत्ताधारी आणि गृहविभाग…
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री हत्या झाली आहे. मुंबईतील वांद्रे भागात बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या हत्येनंतर आता मुंबईत दहशतीचं वातावरण आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. मला त्याबाबतची पुरेशी माहिती नाही. गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल असं भाष्य आम्ही करणार नाही. याची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. त्यांना डिटेल देता येत नाही. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही, असं शरद पवार म्हणाले.
दिवस फार थोडे राहिले आहे. दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागेल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. निवडणुकीची प्रक्रिया संपल्याशिवाय यांना उत्तर मिळणार नाही. लोकांसमोर जाणं आणि लोकांची सुटका करायची आहे. सत्तेत परिवर्तन करणं हाच पर्याय आहे. त्यासाठी लोकांनी साथ द्यावी, असंही शरद पवार म्हणालेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List