Baba Siddique :सलमान खानला दहशत बसवण्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या? पोलिसांचा तपास कोणत्या दिशेला?

Baba Siddique :सलमान खानला दहशत बसवण्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या? पोलिसांचा तपास कोणत्या दिशेला?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत बिश्नोई गँगाचा हात असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी याविषयीचा खुलासा केला आहे. या हत्येच्या तपासात बिश्नोई गँग असल्याचे समोर आले आहे. शूटर्सच्या जबाबानंतर पोलीस या निष्कर्षावर पोहचली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे, सलमान खान याच्यावर दहशत बसवणे हाच उद्देश असल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलीस आता त्यादृष्टीने तपास करत आहेत. सलमान खान याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

बिश्नोई सध्या साबरमती तुरुंगात

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत लाँरेन्स बिश्नोईचा हात असल्याचे समोर येत आहे. बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. अटक करण्यात आलेले शूटर्स, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबई पोलीस, दिल्ली पोलिसांचे विशेष पथक, हरियाणा सीआयए आणि युपी एसटीएफ या सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या सर्व यंत्रणा एकमेकांच्या संपर्कात आल्या आहेत. पकडण्यात आलेल्या दोन्ही शूटर्सची माहिती देण्यात आली आहे.

हत्या सिद्दीकीची, पण दहशत सलमानवर

बाबा सिद्दीकी आणि सलमान खान हे अगदी घनिष्ठ मित्र आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येतून सलमान खान याला थेट संदेश देण्याचा प्रयत्न तर करण्यात आला नाही. त्याला घाबरवण्यासाठी हा प्रकार तर करण्यात आला नाही ना? यादृष्टीने पोलीस तपास करत आहे. हत्येनंतर सलमान खान उशीरा रात्री लीलावती रुग्णालयात पोहचला. त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. सलमान खान हा पूर्वीपासूनच बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. आता बाब सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलीस सर्वच बाजूने तपास करत आहेत. सलमान खान याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्या घराबाहेर बिश्नोई गँगच्या शूटरने फायरिंग केल्याची घटना घडली होती.

वांद्रे पूर्व परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ते त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालयाबाहेर पडले होते. त्याचवेळी अंधाराचा फायदा घेत शूटर्संनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;