बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार, कूपर रुग्णालयात शवविच्छेदन सुरु

बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार, कूपर रुग्णालयात शवविच्छेदन सुरु

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर वांद्र्यासह संपूर्ण मुंबईत तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तान याठिकाणी बाबा सिद्दींकींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर पहाटे साडे पाच वाजता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंधेरीतील कूपर रूग्णालयात आणण्यात आला. यानंतर आठ वाजता बाबा सिद्दिकी यांचं शवविच्छेदन करण्यास सुरुवात होईल. यावेळी व्हीडिओग्राफीदेखील केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण तीन ते चार तासांचा कालावधी लागणार असल्याचे बोललं जात आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते येण्याची शक्यता आहे. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना रात्री 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होईल.

त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी होईल. बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती समोर आली आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;