वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर; पोस्ट मार्टमबाबतचे अपडेट्स काय?

वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर; पोस्ट मार्टमबाबतचे अपडेट्स काय?

माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शनिवारी रात्री 9.15 ते 9.20 च्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. आता बाबा सिद्दिकी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. यासाठी अंधेरी भागातील कूपर रूग्णालयात बाबा सिद्दिकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. यावेळी बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी अॅम्ब्युलन्समध्ये होते. वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी यांना पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले.

पोस्ट मार्टमबाबतचे अपडेट्स काय?

बाबा सिद्दिकी यांची काल हत्या झाल्यानंतर आता त्यांचं पोस्ट मार्टम केलं जाणार आहे. पहाटे साडे पाच वाजता बाबा सिद्दिकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंधेरीतील कूपर रूग्णालयात आणला गेला. यावेळी त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकीदेखील अँब्युलन्समध्ये होते. काहीच वेळातबाबा सिद्दिकी यांचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. शवविच्छेदनावेळी व्हीडिओग्राफीदेखील केली जाणार आहे.

सिद्दिकी कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सिद्दीकी कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे आर.सी.पी दलही तैनात करण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास मुंबई गुन्हे शाखेचे पथक करत आहे. दया नायक हे गुन्हे शाखा युनिट 9 चे प्रभारी आहेत. सध्या पोलिसांनी काल रात्री दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील दोन आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या आरोपींना थोड्याच वेळात कोर्टात दाखल केलं जाणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;