बिष्णोई गँगशी संबंध?, सुपारीचे पैसे, बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी बंदूक कुणी पुरवली?
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये बाबा सिद्दिकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. काल रात्री 9.15 ते 9.20 च्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात झालेल्या गोळीबारामुळे बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अपडेट्स समोर येत आहेत. या हत्या प्रकरणात बिष्णोई गँगचा संबंध असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. मुंबई क्राईम ब्रांच यूनिट 3 मध्ये दोन्ही आरोपींची चौकशी केली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List