Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारे ‘ते’ 3 शार्प शूटर कोण? फोटो समोर

Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारे ‘ते’ 3 शार्प शूटर कोण? फोटो समोर

Baba Siddique Death : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. देवीची विसर्जन मिरवणूक जात असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली. तीन जणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर पालिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून एक जण फरार आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांचा फोटो देखील समोर आला आहे.

2 आरोपींची पटली ओळख

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 आरोपी हरियाणा येथील असून दुसरा आरोपी उत्तर प्रदेश याठिकाणी राहणारा आहे. तिघांमधील एक आरोपी अद्यापही फरार आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी अन्य राज्यातील शूटरला सुपारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच आरोपींबाबत फारशी माहिती देखील समोर आलेली नाही.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘घडलेली घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. माझं डॉक्टर आणि पोलिसांसोबत बोलणे झाली आहे. याप्रकरणी दोन जणांनी अटक करण्यात आली आहे. त्यामधील एक यूपी आणि एक हरियाणा येथील आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आम्ही मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. मुंबई पोलीस लवकरच तिसऱ्या आरोपीला अटक करतील अशी खात्री आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.’ असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;