Baba Siddique : किती आहे बाबा सिद्दीकी यांची संपत्ती? दरवर्षी देतात बॉलिवूड सेलेब्रिटींना ग्रँड इफ्तार पार्टी

Baba Siddique : किती आहे बाबा सिद्दीकी यांची संपत्ती? दरवर्षी देतात बॉलिवूड सेलेब्रिटींना ग्रँड इफ्तार पार्टी

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना काही वेळेपूर्वी घडली. त्यांच्यावर वांद्रे पूर्व येथील कार्यालयजावळील राम मंदिराजवळ गोळीबार करण्यात आला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी त्यांच्या अत्यंत जवळचे होते. ते दरवर्षी ग्रँड इफ्तार पार्टी द्यायचे. या पार्टीत सलमान खान, शाहरूख खानसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज हजेरी लावायचे. कोण होते बाबा सिद्दीकी, किती होती त्यांची संपत्ती?

सामाजिक आंदोलनातून राजकारणात

मुंबईत महाविद्यालयात शिकत असताना त्यांचा विविध आंदोलनाशी संबंध आला. त्यांनी एमएमके महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यातूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. विविध आंदोलन करता करता ते काँग्रेसच्या संपर्कात आले. मुंबईतील काँग्रेसमध्ये त्यांनी पुढे विविध पदं भुषवली. ते मुंबई महापालिकेत दोनदा नगरसेवक होते. त्यावेळी त्यांनी बरीच कामं केली. त्यांचा राजकारणातील व्याप वाढला. 1999,2004 आणि 2009 असं तीनदा ते आमदार झाले. त्यांनी विधानसभेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले. ते राज्यमंत्री राहिले. त्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार गट जवळ केला होता.

1977 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मुंबईतील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग होता. गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी त्यांचे काम होते. त्यांनी आमदार निधी विविध सामाजिक आणि विकास कामासाठी खर्च केल्यानंतर ते जनतेत लोकप्रिय झाले. त्यांनी सलग विधानसभेत प्रतिनिधित्व केलं.

बाबा सिद्दीकी यांची संपत्ती किती?

बाबा सिद्दीकी हे त्यांच्या ग्रँड इफ्तार पार्टीसाठी ओळखल्या जातात. फ्रेसर्स लाईव्हमधील एका अहवालानुसार, बाबा सिद्दीकी यांची एकूण संपत्ती अंदाजे 7.2 दशलक्ष असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात त्यांची एकूण संपत्ती किती याविषयीची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवूड क्षेत्रातील अनेक सेलेब्रिटींसोबत चांगले संबंध होते. त्यांच्या इफ्तार पार्टीत झाडून अनेक स्टार दिसत. 2018 मध्ये बाबा सिद्दीकी यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. त्यावेळी जवळपास 462 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;