अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार, लिलावती रुग्णालयात उपचार सुरु, आरोपी ताब्यात

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार, लिलावती रुग्णालयात उपचार सुरु, आरोपी ताब्यात

Baba Siddique firing : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे पूर्व परिसरात ही घटना घडली. सध्या बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाबा सिद्दीकी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या एका सहकाऱ्यालाही यावेळी गोळी लागली.

बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली गोळी

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाल्याचे बोललं जात आहे. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला.

लिलावती रुग्णालयात उपचार सुरु 

या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. अजित पवार यांनीही रुग्णालयात फोन करुन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे. तसेच मुंबईतील अजित पवार गटाचे नेते हे लिलावती रु्गणालयात दाखल होत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अभिनेता संजय दत्तही लिलावती रुग्णालयात दाखल झाला आहे.

सयाजी शिंदेंच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थितीत

बाबा सिद्धिकी हे आमदार झिशान सिद्धिकी यांचे वडील आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी देखील ते उपस्थित होते.

कोण आहेत बाबा सिद्दीकी ?

बाबा सिद्दीकी हे केवळ राजकारणीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांचं नाव प्रसिद्ध होतं. दरवर्षी त्यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. या पार्टीसाठी फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सही शामिल होतात. शाहरूख खान, सलमान खान हेही आवर्जून सिद्दीकी यांच्या पार्टीत शामिल होतात. सलमान खान याचे बाबा सिद्दीकीशी जवळचे संबंध होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;