होती दाढी म्हणून उद्धवस्त केली महाविकास आघाडी, एकनाथ शिंदे यांची तूफान टोलेबाजी

होती दाढी म्हणून उद्धवस्त केली महाविकास आघाडी, एकनाथ शिंदे यांची तूफान टोलेबाजी

शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदान झाला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांची खच्चीकरण होऊ नये म्हणून आम्ही उठाव केल्याचे सांगितले. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार ते विसरले. बाळासाहेब म्हणाले अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केला नसता तर शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं,सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता असेही एकनाथ शिंदे यांनी आपल्या उठावामागचे कारण केले.

जर आम्ही उठाव केला नसता तर आपला महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. महाराष्ट्र मागे गेला होता. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही अडीच वर्षांत महाराष्ट्र नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. महाविकास आघाडी असताना सरकार तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्यात आपण पहिल्या नंबरवर राज्य आणलं असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की कोविडला घाबरून घरात बसलेला मी मुख्यमंत्री नाही. तर रस्त्यावर येऊन लढणारा हा मुख्यमंत्री आहे असेही ते म्हणाले.

माझी दाढी खुपतेय

सरकार घालवलं नसतं तर योजना आल्या नसत्या. उद्योग आले नसते. लाडकी बहीण योजना आली नसती. बहिणींना सन्मान मिळाला नसता. तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती. पहिल्या अडीच वर्षात काय झालं महाीत आहे. कसं होणार?. कारण त्या अडीच वर्षात महाराष्ट्र विरोधी विकास आघाडी राज्यात सत्तेवर होती. दिसेल ते काम बंद करण्याचं काम केलं. मेट्रो,बुलेट, कारशेड, जलयुक्त शिवार याला ब्रेक लावला. जिथे नव्हता ब्रोकर तिथे टाकले स्पीड ब्रेकर. असं यांचं काम होतं. आम्ही हे स्पीड ब्रेकर उखडून टाकलं. ज्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले ते सरकारच उखडून टाकलं. माझी दाढी खुपतेय. अरे होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि विकासाची जोरात वाहू लगाली गाडी. ही दाढीची करामत आहे. म्हणून सांगतो मला हलक्यात घेऊ नका असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;