तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, अन् धारावीकरांना खितपत ठेवा…एकनाथ शिंदे यांचा धारावी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना टोला

तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, अन् धारावीकरांना खितपत ठेवा…एकनाथ शिंदे यांचा धारावी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावर दसरा मेळाव्यातून जोरदार हल्ला केला. मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना शिवसेना उबाठाने लूट केली. ते म्हणाले, जिथे टेंडर तिथे सरेंडर. कंत्राटदारांना सूट देताना जनाची नाही तरी मनाची वाटली पाहिजे होती. गेली २५ वर्षे तुमची मुंबईत सत्ता होती. पण तुम्हाला लोकांशी काही घेणंदेणं नव्हतं. धारावीतील लोक आले आहेत. धारावी हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. पण त्यातही काड्या घालण्याचं काम सुरू आहे. पहिला कंत्राटदार होता तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं. त्यांनी कंत्राटदार का रद्द केला सर्वांना माहीत आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा. पण धारावीकरांना खितपत ठेवण्याचं काम केलं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

धारावीकारांनी अफवांना बळी पडू नका

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही माहिती घेतली. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जे पात्र त्यांना घरे द्या. मी म्हटलं जे राहतात त्या सर्वांना घर द्या. एक घराची किंमत एक कोटी. दोन लाख घराची किंमत दोन लाख कोटी आहे. धारावीकारांनी अफवांना बळी पडू नका. तुमचं हित काय, स्वप्न काय ते पाहा.

फेसबुक लाइव्हच झालं असतं…

आपण उठाव केला नसता तर फक्त फेसबुक लाइव्हच झालं असतं. आपण फेसबुक लाइव्हवाले नाही, आपण फेस टू फेस काम करणारे लोक आहोत. बाळासाहेब म्हणायचे नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. आपण ते शिकलो. करतो. पण नर्मदेचे गोटे कोरडेच राहिले. महाराष्ट्राचं चित्र काय असंत. मोरू उठला, अंघोळ केली. अन् मोरू झोपला. आता तोच मोरू गल्लो गल्लीत फिरत आहे. दिल्लीत फिरत आहे. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणून फिरत आहे. अरे बाबा तुमच्या सहकाऱ्यांना तुमचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून चालत नाही, मग राज्यातील जनतेला कसं चालेल.

मी दोन वर्षांचा रिपोर्ट कार्ड देतो, तुम्ही अडीच वर्षाचे द्या…

मी दोन वर्षातील रिपोर्ट कार्ड द्यायला तयार आहे. तुम्ही अडीच वर्षातील दाखवा. हिंमत असेल तर दाखवा. कोविडचं कारण सांगून त्यांना लपवता येणार नाही. लोक मरत होते, तुम्ही पैसे मोजत होता. कुठे फेडाल हे पाप. आम्ही रस्त्यावर होतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;