सत्ता आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

सत्ता आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्या उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार आणि केद्र सरकारवर जोरदार टीका केली. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील शिवरायांच्या पुतळा पडल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शिवरायांचे स्मारक देखील तुम्हाला करता आले नाही. आपले सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजाचं मंदिर बांधल्या शिवाय राहणार नाही अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की कृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला. पण अंमलात आणली ती शिवाजी महाराजांनी. त्यांच्यावरही आप्तस्वकीय आले होते. त्यांनी विचार केला नाही. त्यांनी चालून येणाऱ्यांचा शिरच्छेद केला. आपल्यालाही असाच शिरच्छेद करावा लागेल. आपण जय श्रीराम बोलतो. पण पुराणात राम होऊन गेले. श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून पाळतो. रामाबरोबर वानर सेना होती. आपण त्यांना दे मानतो. आमच्या शिवाजी महाराज कोण होते. फार पूर्वी नाही, तेव्हा जे स्वराज्यावर चालून आले, त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतो. आपलं काय झालं असतं कुणाला माहीत नाही. रामाने जसै दैत्य मारले. तसे शिवाजी महाराजांनी राक्षस आणि दैत्य मारले. अफजल खान हा दैत्यच होता असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधू

उद्धव ठाकरे यावेळी त्वेषाने म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. नालायकांनो पुतळा पाडला. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आमचं दैवत आहे. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो. तसं आम्ही त्याच मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणणार. जय शिवराय हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. दुसरा कोणता राजा पृथ्वीवर असा झाला नाही. आज 400 वर्षांनंतर आज जय भवानी म्हटले तरी मुर्दाही उठून जय शिवाजी म्हणले असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;