राज साहेब… त्यात तुमचाही एक चमचा आहे; किशोरी पेडणेकर यांचा ‘त्या’ विधानावरून हल्लाबोल

राज साहेब… त्यात तुमचाही एक चमचा आहे; किशोरी पेडणेकर यांचा ‘त्या’ विधानावरून हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आज दसऱ्या निमित्ताने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारण बिघडलं आहे, राजकारणाचा दर्जा घसरला आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या विधानाचा माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी समाचार घेतला आहे. राज्यातील राजकारण बिघडलंय. हे खरं आहे. राज ठाकरे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. पण हे राजकारण बिघडवण्यात राज साहेब तुमचाही एक चमचा आहेच, असा हल्लाच किशोरी पेडणेकर यांनी चढवला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या पाच वर्षात राजकारण नक्कीच बिघडले आहे. परंतु ते बिघडण्यामध्ये एक चमचा तुमचा देखील आहे. 40 आमदारांची गद्दारी झाली, त्यावेळेस तुमच्याकडे येत होते. तेव्हा त्यांना तुम्ही छाती ठोकून का नाही सांगितलं? राजकारण आम्ही बिघडवलं म्हणत असतील तर राज ठाकरेंनी काय केल? राज यांचा पण काहीतरी वाटा आहे की? ज्यावेळी तुमच्याकडे ते पायघड्या घालत होते, त्यावेळेस त्यांना ठणकावून का नाही सांगितलं? हे बिघडवण्यामध्ये खारीचा वाटा तुमचा पण आहे, असा पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला.

नाव घेऊन बोला

राज ठाकरे यांना भेटला नाही असा भाजपचा एकही नेता राहिला नाही. सर्वच नेते भेटून जात आहेत. तुम्हाला लोकांनी नाशिकमध्ये संधी दिली होती. पण तिथे काय झालं? कोण काय आहे हे लोकांना माहीत आहे. संधी द्यायची की नाही हे लोकं ठरवतील. सोनं दुसरे लुटून नेत आहेत. दुसरे कशाला? जे लुटून नेत आहेत. त्यांची नावे घ्या. आम्ही सरळ नाव घेऊन बोलतो. तुम्हीही नाव घेऊन बोला, असा हल्लाही किशोरी पेडणेकर यांनी चढवला.

तेच टॉनिक आमचं सुरूय

मी मुद्दाम दसरा मेळाव्याचं काऊंट करत असते. कारण गेली दोन वर्ष इतर ठिकाणीही दसरा मेळावा होत आहे. आमचा दसरा मेळावा सलगपणे होत आहे. फक्त दोनदा नैसर्गिक आपत्तीमुळे झाला नव्हता. एक नेता, एक झेंडा, एक जागा आणि तेच टॉनिक आमचं सुरू आहे, असं त्या म्हणाल्या.

इकडे दसरा, तिकडे पसरा

गेल्या अडीच वर्षात इकडे दसरा आणि तिकडे पसरा असं चाललंय… शिंदेंनी शिवसेना हायजॅक केल्यानंतर काय काय करतायत हे जनता पाहत आहे. निवडणूक घ्यावी लागत आहे…. जेव्हा आचारसंहिता लागेल तेव्हा आम्ही म्हणू की निवडणूक आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

मंत्रीपद मिळालं म्हणून पळाला

उदय सामंत सांगत होते याच्या आधी गद्दारी झाली नाही का? अहो, तुमच्या एवढी हिम्मत कोणी केली नाही. हा एक दोन महिन्याचा प्रकार नव्हता तर हा दोन वर्षाचा प्रकार होता. तुम्हाला पद मिळालीत, मंत्री पद मिळाले म्हणून तुम्ही पळून गेला, असा टोला त्यांनी उदय सामंत यांना लगावला

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;