हीच क्रांतीची वेळ…; विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरेंचं जनतेला महत्वपूर्ण आवाहन
आज दसरा सणाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘राजमुद्रा’ या पॉकास्टच्या माध्यमातून संबोधित केलं. यावेळी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं जनतेला महत्वपूर्ण आवाहन केलं आहे. हीच क्रांतीची वेळ आहे, असं राज ठाकरे म्हणालेत.
राज ठाकरेंकडून दसऱ्याच्या शुभेच्छा
आज दसऱ्याचा सण… साडे तीन मुहुर्तांपैकी एक…. आपण सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. दसरा म्हटलं आपण सोनं लुटणं, एकमेकांना शुभेच्छा देणं हे आपण दरवर्षी करत असतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्षे लुटलं जात आहे. आपण आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून काहीही राहत नाही. बाकी सोनं लुटून चालले आहेत. पण आमचं दुर्लक्ष… पण आम्ही सध्याच्या आयुष्यात मश्गुल… तर कधी जातीपातीमध्ये मश्गुल… आमचं याकडे लक्ष जाणार कधी? आजचा दसऱ्याचा सण खूप महत्वाचा आहे. हा दसरा निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशा वेळी तुम्ही बेसावध राहून चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राची प्रगती कोणत्या दिशेने चालली आहे सांगा… नुसते रस्ते बांधणं, पूल बांधणं, उड्डाणपूल बांधणं म्हणजे ही काय प्रगती नसते. आमच्या घरात कलर टीव्ही आला, मोबाईल आला. गॅजेट्स म्हणजे प्रगती नव्हे… प्रगती ही डोक्यातून व्हावी लागते. परदेशात जेव्हा मी जातो तेव्हा लक्षात येतं की याला प्रगत देश म्हणतात. इतकी वर्षे ही लोकं तुमच्यासमोर प्रगतीच्या थापा मारत असताना देखील तुम्हाला राग येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List