राज्यात आज ‘राजकीय दसरा मेळावे’; ठाकरे- शिंदे- मुंडे संबोधित करणार, जरांगेंही राजकीय घोषणा करणार?
आज साडे तीन मुहुर्तांपैकी एक असणारा दसरा सण आज साजरा होत आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवत थोड्याच वेळात संबोधित करतील. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्यात दसरा मेळावे होत आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. तर तिकडे बीडमध्येही दोन दसरा मेळावे होणार आहेत. बीडमधील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तर बीडच्या नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होणार आहे. त्यामुळे आजच्या राज्यात राजकीय दसरा मेळाव्यामध्ये आव्वाज कुणाचा? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मराठा आरक्षणसाठी लढा देणारे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्यातील नारायण गड या ठिकाणी दसरा मेळावा घेत आहेत. रात्रीपासून या मेळाव्यासाठी लाखो मराठा बांधव नारायण गडावर जमायाल सुरुवात झाली आहे. तब्बल 200 एकर परिसरात मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरणार असल्याचं मनोज जरांगेंनी आपल्या भाषणात अनेकदा म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जरांगे काही मोठी घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List