New Mumbai Airport: नवी मुंबईतील विमानतळावर हवाईदलाच्या विमानांची भरारी, धावपट्टीची चाचणी यशस्वी

New Mumbai Airport: नवी मुंबईतील विमानतळावर हवाईदलाच्या विमानांची भरारी, धावपट्टीची चाचणी यशस्वी

नवी मुंबईकरांच्या प्रतिक्षेतील असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी झाली. भारतीय हवाईदलाचे ‘सी 295’ विमान विमानतळावर लँण्डींग झाले आहे. लँण्डींग पूर्वी विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डींग झाले. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट’ करण्यात आले. ‘सी 295’  विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर उतरले. या चाचणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवण्यात आले. परंतु त्यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान या विमानतळावरुन मार्च २०२५ महिन्यात देशांतर्गत विमाने सुरु होणार असून आंतरराष्ट्रीय विमाने जून २०२५ पासून सुरु करण्याचा मानस सिडकोचे अध्यक्ष अन् आमदार संजय शिरसाट यांनी दिले.

विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे

विमानाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावपट्टीची पाहणी केली. तसेच विमानाची पाहणी केली. हवाईदलाचे हे मोठे विमान आहे. विमानतळ उभारण्यासाठी अनेक अडचणी आल्या. त्या सर्व अडचणींवर मात करुन विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु होते.

350 विमाने एकाच वेळी पार्क होणार

नवी मुंबई विमानतळावरील एक धावपट्टी तयार झाली आहे. त्याची चाचणी घेण्यात आली आहे. विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहे. विमानतळावरील 4 टर्मिनलवर जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क केली जाऊ शकतात. तसेच या विमानतळावर मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी असणार आहे. सिडकोकडून हे विमानतळ उभारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळावर 4 टर्मिनल बिल्डिंग आहेत. मात्र कुठेही चेक इन केले तरी प्रवाशांना त्यांच्या फ्लाईटपर्यंत पोहचता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान धावपट्टीवर उतरताच अभिनंदन केले. यावेळी हवाईदलाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. ‘सी 295’  विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर यशस्वीपणे उतण्याचा क्षण अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;