New Mumbai Airport: नवी मुंबईतील विमानतळावर कधीपासून भरारी? चाचणी यशस्वीनंतर सरकारने सांगितला प्लॅन
'सी 295' विमानाने सात ते आठ घिरट्या अवकाशात घातल्या. त्यानंतर पाण्याचे धावपट्टीवर उतरले. विमान धावपट्टीवर उतरताच त्याला 'वॉटर सॅल्यूट' देण्यात आले. दोन बाजूंनी पाण्याचे फवारे सोडून त्यामधून विमान गेले.
विमानाच्या चाचणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवण्यात आले. परंतु त्यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन येत्या मार्च महिन्यात देशांतर्गत विमानांचे उड्डन सुरु होणार आहे. तसेच त्यानंतर तीन महिन्यांत म्हणजे जून महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डान होणार असल्याचे सिडकोचे चेअरमन संजय शिरसाट यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरु होते. त्यावर एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले. त्याची चाचणीसुद्धा यशस्वी झाली. विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List