OK TATA : ट्रकच्या मागे ‘ओके टाटा’ असे का लिहीलेलं असतं ? काय त्याचा अर्थ

OK TATA : ट्रकच्या मागे ‘ओके टाटा’ असे का लिहीलेलं असतं ? काय त्याचा अर्थ

Ratan Tata: रस्त्यावरील वाहनांच्या मागे बहुतेकदा ट्रकच्या मागे अनेक शेरोशायरी वाचत तुम्ही प्रवास केलेला असेल. अनेकदा या शेरोशायरी मनोरंजनाबरोबर ज्ञान वाढविणाऱ्याही असतात. अनेकदा ट्रकच्या मागे ओके टाटा, किंवा हॉर्न ओके प्लीझ असे लिहीलेले असते. काही जणांच्या मते ट्रक ओळखण्यासाठी असे लिहीलेले असते. परंतू असे काही नाही. यामागे देखील टाटा यांचे कनेक्शन आहे. ट्रकच्या मागे यापुढे शेरो शायरीसोबत लिहीलेल्या ओके टाटा याचाही अर्थ जाणून घ्यायला हवा. याचे उत्तर टाटा ग्रुपकडून मिळते. जे दुचाकी आणि चारचाकी आणि ट्रकच्या निर्मितीतही पुढे आहे. परंतू दुचाकी आणि चार चाकीवर असे काही लिहीलेले नसते मग ट्रकवर ओके टाटा असे का लिहीलेले असते ?

अशा प्रकारचे ओके टाटा हे शीर्षक केवळ त्याच ट्रकवर लिहीलेले असते ज्यांची निर्मिती टाटा कंपनीने केलेली आहे. तसेच जर वाहनांवर ओके टाटा लिहीलेले असेल म्हणजे त्याची टेस्टींग झालेली आहे. आणि ते वाहन योग्य स्थितीत आहे. हे लिहिण्या मागे एक तर्क असाही आहे की गाडीचे मॅन्युफॅक्चरींग आणि रिपेअरिंग टाटा मोटर्स कंपनीच्या मानकांनुसार झालेली आहे. या वाहनांची वॉरंटी केवळ टाटांकडे आहे. हे बिंबवण्यासाठी अशा प्रकारची ओके टाटा अशी मोहर लावलेली असते.

ब्रॅंडींगचा आधार बनले…

ओके टाटा ….कंपनीने भलेही हे दोन शब्द आपल्या पॉलीसीसाठी बनवले आणि ट्रकवर लिहीले,परंतू हळूहळू हे ब्रॅंडींगचा हत्यार बनले. ट्रकच्या आधारे हे शब्द देशभरात पसरले. आजही अगर कोणाला ओके टाटा असे म्हटले की तो समजतो की कुठे हे शब्द जादा लिहीलेले असतात.

ट्रकची निर्मिती करणारी टाटा मोटर्स आज देशाची टॉपची ऑटोमोबाईल कंपनी आहे. याची सुरुवात साल 1954 पासून झाली.टाटा इंजिनिअरिंग एण्ड लोकोमोटीव्ह कंपनी रुपात या कंपनीची सुरुवात झाली त्यानंतर याचे नाव बदलून टाटा मोटर्स असे करण्यात आले.त्यावेळी ही कंपनी रेल्वेची इंजिन तयार करायची. दुसऱ्या महायुद्धात टाटाने सैन्याला टॅंक ( तोफ ) बनवून दिला होता. टाटानगर टॅंक नावाने तो ओळखला जात असे. या टॅंकने शत्रूची वाताहत करुन टाकली. काही काळांनी टाटाने ऑटोमोबाइल इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. मर्सिडीझ बेंझ सोबत भागीदारी करीत साल 1954 मध्ये व्यावसायिक वापरासाठी वाहन लॉंच केले. कंपनीने 1991 मध्ये प्रवासी वाहन बनविण्यासाठी सुरुवात केली. पहिली स्वदेशी कार निर्माण केली. टाटा सिएरा तिचे नाव. त्यानंतर अनेक कारची निर्मिती करुन टाटा देशाची टॉपची ऑटोमोबाईल कंपनी बनली.

त्यानंतर टाटाने इस्टेट, टाटा सुमो या वाहनांना बाजारात उतरवले, टाटा सुमो भारतीय बाजारात लोकप्रिय केली. त्यानंतर टाटा इंडिका बाजारात प्रसिद्ध झाली. या फॅमिली कारला साल 1998 मध्ये बाजारात आणले. ज्याने विक्रीत रेकॉर्ड केले. टाटा ग्रुपला वेगळ्या उंचीवर नेणारे रतन टाटा आज आपल्यात नाहीत. त्यांचे कार्य आणि संघर्ष अनेकांना प्रेरणा देत राहील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;