टाटायन…; रतन टाटांच्या ‘त्या’ एका विचाराने मरगळलेल्या टाटा उद्योगाला नवी उभारी
रतन टाटा… ज्यांचं नाव घेतल्याशिवाय भारताचं उद्योग वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. नसरवानजी टाटा यांनी उभारलेल्या, जमशेदजी टाटा यांनी वाढवलेल्या टाटा उद्योग समुहाना विस्तारण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा राहिला आहे. आज एकही अशी वस्तू नाही जी टाटा ग्रुप तयार करत नाही. पिढ्यान् पिढ्याच्या व्यवसायाला रतन टाटा यांनी नवी उभारी दिली ती जे. आर. डी. यांच्या विचाराने आणि आधुनिकतेच्या वाटेने… रतन टाटा जेव्हा टाटा उद्योग समुहात आले तेव्हा त्यांच्या एका विचाराने मरगळलेल्या व्यवसायाला त्यांनी नवी उभारी दिली.
रतन टाटांची एन्ट्री
टाटा समुहाचा ‘नेल्को’ अंतर्गत हा रेडिओची निर्मिती करत होता. एकेकाळी नेल्कोचं मार्केट शेअर 20 % होतं. जे 2 टक्क्यांवर येऊन ठेपलं. टाटा समुहामध्ये मरगळ निर्माण झाली होती. अशावेळी जमशेदजी टाटा यांच्या नातवाला ‘नेल्को’ला पुन्हा रूळावर आणण्यासाठी बोलावण्यात आलं. जमशेदजी टाटा यांचा हा नातू म्हणजेच रतन टाटा… तसं तर 1962 पासूनच रतन टाटा हे फॅमिली बिझनेसवर काम करू लागले. पण 1071 ला अधिकृतरित्या रतन टाटा यांना काम करायला सुरुवात केली अन् सुरु झाला प्रवास ‘टाटायन’चा…
‘त्या’ एका विचाराने टाटा उद्योगाला नवी उभारी
1971 टाटा ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह होताच रतन टाटा यांनी मोठा निर्णय घेतला. रेडिओ बनवणं थांबवूयात. कारण जर ‘नेल्को’ला नव्याने उभं करायचं असेल तर आपल्याला नवा विचार आणावा लागेल. आपण सॅटलाईट कम्युनिकेशनवर काम सुरु करूयात, असं रतन टाटांनी सुचवलं. तसं काम सुरु झालं आणि 1975 ला पुन्हा एकदा ‘नेल्को’ चा मार्केट शेअर 20 टक्क्यांवर आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List