बारामतीत कोण उभं राहणार?, अजित पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया; सस्पेन्स वाढला?

बारामतीत कोण उभं राहणार?, अजित पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया; सस्पेन्स वाढला?

ष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर अजितदादांनी लोकसभा निवडणूकीत त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपली बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले होते. परंतू सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यानंतर अजितदादांनी कुटुंबाला राजकारणात आणणे योग्य नसल्याचे सांगत तेथे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे ही आपली राजकीय चूक होती अशी कबूली दिली होती. तसेच बारामतीमधून आता आपण उभे राहणार नसल्याचे अजितदादांनी मागे जाहीर करुन टाकले होते. त्यात काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगला तासभर अजितदादांची गाडी अडवून धरत बारामतीतून त्यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली होती. आता यावर अजितदादा काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजारा लागल्या असताना अजितदादांनी आपले मत सांगून टाकले आहे.

अजितदादांच्या कारला काल कार्यकर्त्यांनी अडवून धरत त्यांना बाारामतीतून उभे राहण्याचा आग्रह केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात विविध चर्चांना उधान आले असून आता बारामतीतून कोण उभे राहणार ? दादा कार्यकर्त्यांचा आग्रह मानणार का ? की बारामतीतून अन्य कोणाला संधी देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.यात आता अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांना कालच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनबद्दल आणि बारामतीतून कोणाला संधी मिळणार याबद्दल विविध प्रश्न विचारले. महायुतीतील जागा वाटप झाले काय ? या प्रश्नाला आम्ही जागा वाटप झाले की तुम्हाला जागा वाटपाविषयी योग्य ती माहिती सांगू ,कुठल्या जागा कोणाला मिळाणार आहेत हे आम्ही तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सांगू असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

बारामतीत कोण ?

बारामतीत कोणता उमेदवार देणार या विषयी अजितदादांना विचारले तर अजितदादांनी थेट उत्तर दिले नाही. ते म्हणाले की जागा वाटपामध्ये बारामतीची जागा ज्याला सुटेल, त्यानंतर तिथला उमेदवार कोण असेल हे ठरवलं जाईल असे अजितदादांनी दिले आहे.जागा वाटापूर्वी लोक बंडखोरी करीत आहेत याबद्दल विचारले असता अजितदादा म्हणाले की निवडणुकीपूर्वी बरेच इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत असतात. एखाद्या इच्छुक उमेदवाराला वाटलं की ही जागा आपल्या पक्षाला सुटणार नाही तर त्यावेळेस ते उमेदवार इतर पक्षांचे दरवाजे ठोठावत असतात असेही ते म्हणाले. या पूर्वीच्या निवडणुकीत देखील असं झालं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्या पक्षात इलेक्टिव्ह मेरिट असलेले उमेदवार नसतात ते दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आयात करत असतात, असं म्हणत अजितदादांनी नाव न घेता शरद पवार यांना यावेळी टोला लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;