भाजप श्रेष्ठींकडून एकनाथ शिंदेंना झुकते माप, भाजपमध्ये सुरु झाले ‘नाराजीनाट्य’, नेमके काय आहे कारण?

भाजप श्रेष्ठींकडून एकनाथ शिंदेंना झुकते माप, भाजपमध्ये सुरु झाले ‘नाराजीनाट्य’, नेमके काय आहे कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत येत आहे. यावेळी पंतप्रधान ठाण्यात मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या लाईनच्या उद्घाटन करणार आहे. मुंबई ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिले जात असल्याचे म्हटले जात आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुंबईत करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात करणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनिमित्त शक्तिप्रदर्शनाची संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे ठाण्यात कार्यक्रम होत असल्याने भाजपमधील नेते अन् कार्यकर्ते नाराज झाले आहे.

…यामुळेही भाजपमध्ये नाराजी

राज्यातील विविध महामंडळांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. त्यामुळे सत्तेतील लाभ व महत्वाची पदे शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मिळत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होत आहे. भाजप कार्यकर्त्यांना त्याग अन् काम करण्याचे धडे पक्षातील श्रेष्ठींकडून देण्यात येत आहे.

जागा वाटपावरुन नाराजी

लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदार संघाचा तिढा चांगलाच पेटला होता. भाजप कार्यकर्ते ठाणे मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यास तयार नव्हते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी दबाव आणून ही जागा शिंदे गटाला सोडण्यास भाग पाडली. आता विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने ठाणे जिल्ह्यातील भाजपला हव्या असलेल्या काही जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे श्रेय शिंदे आणि पवार गटाला मिळत असल्याने भाजपमध्ये नाराजी वाढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत येत आहे. या दौऱ्यात आरे कॉलनी ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे बीकेसी दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचे उद्धघाटन ठाण्यातून ते करणार आहे. १२ किलोमीटरचा हा मार्ग आहे. या टप्प्यात एकूण १० स्थानके असणार आहे. तसेच यावेळी नरेंद्र मोदी राज्यातील इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;