चलो मुंबई… हेच का अच्छे दिन?; शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार

चलो मुंबई… हेच का अच्छे दिन?; शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार

स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. मात्र ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं. मात्र आता आठ वर्षे उलटून गेली असताना अद्याप शिवस्मारकाचं काम झालेलं नाही. यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे यांनी सरकारला घेरलं आहे. येत्या सहा ऑक्टोबरला संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केलं जाणार आहे.

संभाजीराजे यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असं म्हणत संभाजीराजे यांनी मोर्चाची हाक दिली आहे. चलो मुंबई… हेच का अच्छे दिन? असा सवालही संभाजी राजे यांनी केला आहे.

संभाजीराजे यांची पोस्ट

#चलो_मुंबई

मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत.
येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही…
चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला…
रविवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी,
सकाळी ठीक ११ वाजता
स्थळ : गेट वे ऑफ इंडिया, मुंबई.

विधानसभा निवडणुकीआधी संभाजीराजे छत्रपती हे अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. स्वराज्य या त्यांच्या पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे चिन्हही निवडणूक आयोगाने दिलं आहे. अशातच आता ते सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. शिवस्मारकावरून त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;