महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग

महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीची काल रात्री बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. पाच तास ही खलबतं झाली. यात आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. महायुतीच्या जागावाटपावर चर्चा झाली. कोण किती जागा लढणार? कोणती जागा कुणाकडे असणार? यावर या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक झाली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली. त्यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीची काल बैठक झाली. पाच तास जागावाटपावर चर्चा झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मुंबई नाका इथं उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचा अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी होती. हा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईत आले. त्यानंतर वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;