बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला

बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला

मुंबईतील ठाण्यात रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला अटक करण्यात आली. बांगलादेशी ही मॉडेल संपूर्ण परिवारासोबत घुसखोरी करुन पश्चिम बंगालमध्ये आली. मुंबईतील ठाणे परिसरात रिया बर्डे म्हणून राहू लागली. परंतु तिचे खरे नाव बन्ना शेख. अडल्ट चित्रपटात काम करणारी ही पोर्न स्टार. घुसखोर असणाऱ्या तिच्या संपूर्ण परिवाराकडे आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडी आहे. बन्ना शेख तिची आई रुबी शेख बहीण मोनी शेख अन् भाऊ रियाज शेख हे चौघे घुसखोरी करुन बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये आले.

बन्ना शेख बनली रिया बर्डे

पश्चिम बंगालमधील रूबी शेख हिची भेट अमरावतीमध्ये राहणाऱ्या अरविंद बर्डे यांच्याशी झाली. त्यानंतर रूबी शेख अन् अरविंद बर्डे यांनी लग्न केले. त्यानंतर बांगलादेशी मुस्लिम परिवार हिंदू झाला. रूबी शेख, अंजली बर्डे बनली. तिची बहीण मोनी शेख रितू बर्डे तर भाऊ रियाज शेख रवींद्र बर्डे बनला. स्वत: बन्ना शेख ही रिया बर्डे बनली. त्यानंतर संपूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट आणि व्होटर आयडी कार्ड बनवला गेला. त्यानंतर रूबी शेख लग्नानंतर कतरमध्ये गेली. तिची मुलगी बन्ना शेख भारताच अश्लील चित्रपटात काम करु लागली.

बांगलादेशी मॉडलने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा याच्या प्रॉडक्शन हाउसमध्येही काम केले. राज कुंद्राचे हे प्रॉडक्शन हाउस अश्लील आणि अडल्ट चित्रपट बनवत होता. या प्रकरणात राज कुंद्रा याला अटकही झाली होती.

का केली अटक

बांगलादेशी अभिनेत्री रिया बर्डे उर्फ बन्ना शेख, हिला ठाणे पोलिसांनी बनावट कागदपत्रांवर भारतीय पासपोर्ट तयार केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. तिच्यावर भारतीय दंड संहिता कलम 420, 465, 468, 479, 34 आणि 14अ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रियाच्या कुटुंबानेही बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय ओळख मिळवली होती.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर यांनी सांगितले की, रियाच्या आईने पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगून बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवले होते. याआधी रियाला मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत अटक केली होती. पोलिसांनी रियाच्या कुटुंबातील इतर सदस्यांवरही गुन्हा दाखल केला आहे. ज्यात तिची आई, वडील, भाऊ आणि बहीण यांचा समावेश आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;