Devendra Fadnavis : मंत्रालयात महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, VIDEO

Devendra Fadnavis : मंत्रालयात महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, VIDEO

महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला. तोडफोडीचा प्रयत्न केला. मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या नावाची पाटी आहे. ही पाटी काढून फेकून दिल्याची माहिती आहे.

मुंबईत संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घरी निघण्याची लगबग सुरु होती. त्यावेळी हा प्रकार घडला. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एक अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरची नावाची पाटी काढून फेकून दिली. त्यानंतर कार्यालयात घुसून आरडाओरडा केला. तिथे असलेल्या कुंड्या फेकल्या. गोंधळ घातला. त्यानंतर तिथून पसार झाली.

ही महिला कोण होती?

ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयच सुरक्षित नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. या महिलेचा आता शोध सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे सध्या निवडणुकीच्या तयारीमध्ये, राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते की नाही? हे समजू शकलेलं नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;