मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडली, पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला आणलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आलं आहे. त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना नेमका काय त्रास झाला? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण त्यांना बॉम्बे हॉस्पिलटला दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. प्रत्येक पक्षात आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींना वेगवेगळ्या शहरांचा दौरा करावा लागत आहे. काही ठिकाणी बैठकांसाठी जावं लागतं. तर काही ठिकाणी सभा, प्रचार सभा किंवा इतर कार्यक्रमांसाठी नेते मंडळी आणि मंत्र्यांना जावं लागतं. यामुळे होणारा सातत्याचा प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो. भुजबळ यांना नेमका काय त्रास होतोय? याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. पण त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या हिंतचिंतकांकडून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List