Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय ?

Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय ?

ज्या देशात मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे भ्रष्टाचाराविरोधा, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना न्याय कसा मिळेल ? हे अपेक्षित होतं, असं संजय राऊत म्हणाले. तरीही न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो, असे त्यांनी नमूद केले. अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानतंर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रकरणी आम्ही वरच्या न्यायलयात अपील करू, सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी नमूद केलं.

काय म्हणाले संजय राऊत ?

मीरा-भाईंदर भागात युवक प्रतिष्ठान संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली. त्यामध्ये घोटाळा , गडबड झाली असा आरोप मी केला नव्हता, तर हा आरोप सर्वात आधी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. त्यावर, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका तेथील आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली होती. यानंतर त्याबद्दल कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी विधानसभेत चर्चा झाली आणि एक आदेश पारीत झाला. मी बोललो, तर माझ्याकडून मानहानी कशी झाली ?, माझा संबंध कुठे आला?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. सगळं ऑन रेकॉर्ड आहे, असं त्यांनी नमूद केलं.

मीरा भाईंदर नगरपालिकेचा रिपोर्ट देखील आहे. काहीतरी गडबड, भ्रष्टाचार आहे असे फक्त प्रश्न मी विचारले. मी काही कागद कोर्टासमोर सादर केले. पण संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले आहे. तरी आम्ही न्याय व्यवस्थेचा आदर करतो. न्यायालयाच्या या आदेशानंतर आम्ही पुढील कोर्टात अपील करणार आहेत, असंही राऊत यांनी स्पष्ट केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;