Sanjay Raut: संजय राऊत शिक्षा, याचिकाकर्त्या मेधा सोमैया यांची पहिली प्रतिक्रिया… बेताल वक्तव्य….

Sanjay Raut: संजय राऊत शिक्षा, याचिकाकर्त्या मेधा सोमैया यांची पहिली प्रतिक्रिया… बेताल वक्तव्य….

Sanjay Raut convicted in defamation case:  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने एका अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहे. त्यासाठी त्यांना पंधरा दिवसांची शिक्षा दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ही शिक्षा संजय राऊत यांना झाली आहे. न्यायालयाच्या निकाल आल्यानंतर मेधा सोमय्या यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास होताच. हा विश्वास आता अधिकच दृढ झाला आहे, असे मेधा सोमय्या यांनी म्हटले आहे.

मेधा सोमय्या यांची प्रतिक्रिया नेमकी काय?

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना मेधा सोमय्या यांनी म्हटले की, माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. हा विश्वास आणखी दृढ झाला आहे. कोणी माझ्या परिवार किंवा माझ्या संस्थेवर बेताल वक्तव्य करत असतील तर अजिबात सहन करणार नाही. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांना जामीन मिळवण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यावर बोलतान त्या म्हणाल्या, त्यांना जमीन मिळाला तर काय करावे, हे पुढच्या पुढे पाहू या. आता आधी कोर्टाची ऑर्डर मिळू द्या. त्यानंतर पुढे काय करावे त्याचा निर्णय घेता येईल.

न्यायालयाच्या निकालास कालावधी लागला आहे का? त्यावर बोलताना मेधा सोमय्या म्हणाल्या, निकालाबाबत मी समाधानी आहे. तसेच या प्रकरणी कोणतेही राजकीय वक्तव्य करण्यास त्यांनी नकार दिला. मेधा सोमय्या या माटुंगा येथील रुईया कॉलेजमध्ये रसायनशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

काय आहे प्रकरण?

मेधा सोमय्या या युवा प्रतिष्ठान नावाची एक संस्था चालवतात. राऊत यांनी 2022 मध्ये त्यांच्यावर 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला. खोटी बिले देऊन पैसे उकळल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे कारण दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केली होती. संजय राऊत या आरोपींच्या पृष्टीसाठी काहीच पुरावे देऊ शकले नाही, त्यामुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;