न कळवता कामावर घेतली सुट्टी, 12 पोलीस शिपाई निलंबित

न कळवता कामावर घेतली सुट्टी, 12 पोलीस शिपाई निलंबित

मुंबई पोलिसांच्या लोकल आर्म्स (सशस्त्र पोलीस) दलातील 12 पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. फोर्ट येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन इमारतींवर (जुनी आणि नवीन इमारत) पहारा देणारे मुंबई पोलिसांचे 11 कर्मचारी आणि त्यांच्या कंपनीचे कारकून हे कोणालाही न कळवता कामावर गैरहजर राहिले होते. त्याप्रकरणी ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. RBI ची सुरक्षा धोक्यात टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांना काम सोपवण्याची जबाबदारी असलेल्या कारकूनालाही शिक्षा देण्यात आली. भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या सुरक्षेला धोका निर्माण करून स्वतःच्या फायद्यासाठी हे गैरवर्तन लपवल्याबद्दल ही शिक्षा ठोठावण्यात आली.

एका वृत्तपत्रानुसार, पोलीस उपायुक्तांनी 12 पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची पुष्टी केली. मात्र, त्यांनी यासंदर्भात अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

पोलिस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकल आर्म्स II विभागाकडे, आरबीआयच्या जुन्या इमारतीत 48 पोलिस आणि नवीन इमारतीत 32 कॉन्स्टेबल नियुक्त करण्याची जबाबदारी होती. कॉन्स्टेबल महेंद्र सांगळे हे लोकल आर्म्स II मध्ये कंपनी A चे कंपनी कारकून म्हणून काम करत होते. तर दुसरे पोलीस कर्मचारी कमलेश मोरे हे त्यांचे सहाय्यक म्हणून काम करत होते. इतर पोलिस कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामांचे वाटप करणे आणि रजेचे अर्ज लिखित स्वरूपात घेणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे.

सांगळे हे 19 ते 25 सप्टेंबर या कालावधीत रजेवर असल्याने मोरे त्यांचे काम सांभाळत होते. रविवारी त्यांना महत्त्वाच्या आस्थापनांवरील गार्ड ड्युटीचे वाटप करण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून त्यांच्या वाटप केलेल्या कर्तव्यांवर अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र, सोमवारी 10 पोलिस कर्मचारी हे जुन्या इमारतीत ड्युटीसाठी आलेच नाही तर सेंट्रल बँकेच्या नव्या इमारतीत 4 पोलीस हेही कामावर रुजू झाले नाहीत. हे समोर आल्यावर अखेर आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे चौकशी केली. काही शिपाई गावाला गेल्याचे चौकशीत उघड झाले. अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या खात्यांतर्गत चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;