Video : काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई लोकलची स्थिती काय?

Video : काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई लोकलची स्थिती काय?

काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आता आज मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आहे. शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने काल रेल्वेसेवा विस्कळित होती. आजही तशीच परिस्थिती आहे. आजही मध्य रेल्वे विस्कळित आहे. अंबरनाथ कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या रेल्वे उशीराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. कामासाठी निघालेल्यांची रेल्वे स्टेशनवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांचे हाल होत आहेत.

मध्य रेल्वे आज पुन्हा एकदा विस्कळित झालीय. कालच्या मुसळधार पावसाचा परिणाम कायम आहे. कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या 10 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहेत. धिमी लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे जलद लोकल्स 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; कल्याण सह अंबरनाथ बदलापूर आणि इतर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

मॅनहोलमध्ये वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील अंधेरी ईस्ट सीप्सजवळ ही घटना घडली. रात्री नऊ वाजता ही महिला काम संपवून घराकडे जात असताना मुसळधार पाऊस पडत होता आणि रस्त्यावर पाणी तुंबले होते. रस्ता ओलांडण्यासाठी महिला डिवाइडरवर चढली असता अचानक नाल्यात पडले. त्यावेळी डिवाइडरवरील नाला उघडा होता आणि सर्वत्र पाणीच पाणी होते, हे महिलेला समजले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा शोध सुरू केला. रात्री 11.30 वाजता दूरच्या नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. विमल आप्पाशा गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत असून, या महिलेचा मृत्यू अत्यंत निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;