कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, डोंगरात खोदकाम सुरू असताना वीज कोसळली, 2 तरुणांचा जागीच मृत्यू

कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, डोंगरात खोदकाम सुरू असताना वीज कोसळली, 2 तरुणांचा जागीच मृत्यू

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याचा मोठा फटका काही ठिकाणी बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण ग्रामीणमध्ये कांबा म्हारळगाव वरप जवळील पेट्रोल पंप परिसरात सुरू असलेल्या डोंगर खोदकामात आज एक दुर्दैवी घटना घडली. डोंगरात स्फोटकांचा वापर करून खाणकाम चालू असताना अचानक वीज पडली. त्यामुळे आपोआप स्फोटके फुटली. या स्फोटात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी घडली, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्फोटाच्या घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन युवक जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, दुसऱ्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांपैकी एक तरुण मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. त्याचे नाव राजन असल्याचे कळते. त्याचे वय 25 ते 26 वर्षे असल्याचा अंदाज आहे. तर दुसरा मृत व्यक्ती झारखंडचा रहिवासी आहेय त्याचे वय देखील सुमारे 25 ते 26 असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही मृत तरुणांना आणि जखमीना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. या दुर्घटनेने या भागातील कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

जोगेश्वरीत महिला मॅनहोलमध्ये पडली

मुसळधार पावसामुळे मुंबईतही जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन ठप्प झाली आहे. तसेच रस्ते मार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. जोगेश्वरीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जोगेश्वरीत एक महिला मॅनहोलमध्ये पडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवानांकडून महिलेचा शोध सुरु आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;