Mumbai rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे दिल्ली-मुंबई विमान हैदराबादकडे वळवलं

Mumbai rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे दिल्ली-मुंबई विमान हैदराबादकडे वळवलं

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे, मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या १ तासापासून मुंबईत ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळेदिल्ली मुंबई विमान हे हैदराबादकडे वळवण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे विस्तारा कंपनीच विमान हैदराबादला रवाना करण्यात आलं. मुंबईत लँडिंग होऊ शकणार नसल्याने हे विमान हैदराबादला रवाना करण्यात आलंय. विस्तारा कंपनीची दोन विमान मुंबईऐवजी हैदराबादला रवाना केली गेली आहेत.

मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. उद्याही मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांची यामुळे चांगलीच कसरत झाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकांना पाण्यातून वाट काढावी लागलीये.

नवी मुबंईत गेल्या 1तासापासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सानपाडा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला आहे. काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

पुण्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. उद्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. पण मुसळधार पावसामुळे मैदानात चिखल झाला आहे. त्यामुळे उद्याच्या सभेवर पावसाचं सावट दिसत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;