Akshay Shinde Encounter: हे एन्काऊंटर होऊच शकत नाही, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

Akshay Shinde Encounter: हे एन्काऊंटर होऊच शकत नाही, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

Akshay Shinde Encounter Case: बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारच्या वकिलांवर न्यायालयाने प्रश्नांची सरबत्ती करत हे एन्काऊंटर होऊच शकत नाही. या प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील, असा गंभीर इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाकडून प्रश्नांची सरबत्ती

आरोपीच्या डोक्यात गोळी का मारली? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? सामान्य माणूस बंदूक चालवू शकतो का? याला एन्काऊंटर म्हणू शकत नाही, एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे? आरोपीला काबू करायला हवे होते, आरोपीला गोळी का मारली? तीन गोळ्या मारल्या, एक लागली तर दोन गोळ्या कुठे गेल्या? चार पोलीस एका आरोपीला नियंत्रण करु शकत नव्हते का? पिस्तूल की रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारली? फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असती तर पावले उचलावी लागतील? आरोपीने पिस्तूलचे लॉक ओपन करुन राऊंड फायर केले का? जे पोलीस अधिकारी जखमी झाले त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मानवाधिकार आयोगाकडे सादर करा? घटनेशी संबंधित पोलीस अधिकारी कोर्टात आहेत का? असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारले आहे.

सत्य समोर येणे गरजेचे

अक्षय शिंदे प्रकरणात पोकसोमधील आरोपींना वाचविण्यासाठी अंकुश शिंदेला मारला गेला, असा आरोप याचिकाकर्त्यांकडून कोर्टात करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारले. अक्षय शिंदे यांच्या आई-वडिलांच्या वतीने ही याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणातील घटनाक्रम न पटणारा आहे. प्रशिक्षणाशिवाय एखादा व्यक्ती बंदुकीचा स्लायडर चालवता येत नाही. या प्रकरणात तळोजा कोर्टातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची विचारणा कोर्टाने केली आहे. गोळी कुठून चालली? किती लांबून गोळी मारली? पोलिसांच्या कारवाईवर आमचा संशय नाही, पण सत्य समोर येणे गरजेचे आहे, असे हायकोर्ट म्हटले आहे.

अक्षय शिंदे याच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन मिळत नाही? हा मुद्दा यावेळी अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांच्या वकिलांनी मांडला आहे. या एन्काऊंटरमध्ये जे अधिकारी सहभागी झाले आहेत, त्यांच्यासंदर्भात उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहे. यामुळे या याचिकेवर उच्च न्यायालय काय निर्णय देतात याकडे लक्ष लागले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;