नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार

नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला,  350 विमाने एकाच वेळी पार्क होणार

Navi Mumbai Airport Trail : नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे. आता या विमानतळावरुन लवकर विमानांचे उड्डान होणार आहे. 5 ऑक्टोंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते अन् सिडकोचे चेअरमन आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

रन वे वर ट्रायल होणार

आमदार संजय शिरसाट यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केला. त्यावेळी ते म्हणाले, 5 तारखेपर्यंत एअरफोर्सचे एक विमान रन वे वर ट्रायल करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे. या विमानतळावर 4 टर्मिनल आहे. त्या ठिकाणी जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क करू शकतो.

मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी करणार

नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. हे विमानतळ एक माईल्डस्टोन असणार आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील भारही कमी होणार आहे.

असा आहे प्रकल्प

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात उलवा आणि पनवेल दरम्यान 1,600 हेक्टर जमिनीवर तयार होत आहे. त्यासाठी सिडको नोडेल एजन्सी म्हणून काम करत आहे. 19 हजार 600 कोटी रुपये खर्च करुन हे विमानतळ उभारण्यात येत आहे. हा ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रॉजेक्ट 5 टप्प्यात पूर्ण होणार आहे. सिडकोचे निर्देशक विजय सिंघल आणि संयुक्त प्रबंध निदेशक शांतनु गोयल या ठिकाणी सुरु असलेल्या कामांवर लक्ष ठेवत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;