आशिष शेलारांना घेरण्यासाठी काँग्रेस वांद्रे पश्चिममध्ये तगडा उमेदवार देणार, वर्षा गायकवाड कोणाला भेटल्या?

आशिष शेलारांना घेरण्यासाठी काँग्रेस वांद्रे पश्चिममध्ये तगडा उमेदवार देणार, वर्षा गायकवाड कोणाला भेटल्या?

पुढच्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. जागा वाटप, मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही आघाड्यांमध्ये मतभिन्नता दिसू लागली आहे. महाविकास आघाडीमध्ये मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळू शकतात. कारण ठाकरे गटाची मुंबईत बऱ्यापैकी ताकद आहे. पण काँग्रेसची सुद्धा काही मतदारसंघांमध्ये ताकद आहे. यात वांद्रे मतदारसंघ येतो. वांद्रे पश्चिममधून सध्या आशिष शेलार आमदार आहेत. आशिष शेलार हे भाजपाचे मुंबईतील प्रमुख नेते आहेत.

काँग्रेस आशिष शेलार यांना घेरण्याच्या प्लानिंगमध्ये आहे. त्या दृष्टीने काँग्रेसने पावल उचलायला सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. प्रिया दत्ता या माजी खासदार आहेत. या भेटीनंतर प्रिया दत्ता विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरु झाली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांच्या विरुद्ध प्रिया दत्त उमेदवार असू शकतात, असं काँग्रेस पदाधिकारी बोलू लागलेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

सलग दोनवेळा पराभव

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्त यांनी 2014 आणि 2019 ला लोकसभा निवडणूक लढवली. दोन्हीवेळा पुनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा 2024 मध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव केला. लोकसभेला प्रिया दत्त यांनी वर्षा गायकवाड यांच्यासाठी प्रचार केला होता. गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना देखील प्रिया दत्त हजर होत्या.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

“मी प्रिया दत्त यांची भेट घेतली. पण फक्त विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झाली नाही” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. “लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांनी माझा प्रचार केला. मी त्यांचे आभार मानण्यासाठी गेली होती. वांद्रे पश्चिम मतदारसंघाबाबत विशेष चर्चा झाली नाही. पण त्या तिथून चांगल्या उमेदवार ठरु शकतात” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;