सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर ? प्रशासनाचं म्हणणं काय ?

सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर ? प्रशासनाचं म्हणणं काय ?

प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरातली प्रसादावरून संपूर्ण देशात रान पेटलंय. या प्रसादाच्या मुद्यावरून वाद सुरू असतानाचा आता मुंबईतील विख्यात सिद्धीविनायक मंदिरीातील प्रसादही खूप चर्चेत आला आहे. सिद्धीविनायक मंदिरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्धिविनायक मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदरांचा वावर असल्याचा दावा करणारा कथित व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. मात्र या कथित व्हिडीओची टीव्ही9 मराठी पृष्टी करत नाही. या मुद्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.

प्रशासनाचं म्हणणं काय ?

मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला, यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रशासनाने मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा व्हिडीओ मंदिरबाहेरचाही असू शकतो, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते, असे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आलं.

तपासणी होणार

प्रसादाच्या टोपलीत उंदीर असल्याच्या व्हिडीओची तपासणी करण्यात येईल, चौकशी होईल, असं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी स्पष्ट केलं. मंदिर प्रशासनातर्फेही घडलेल्या प्रकाराची तपासणी होईल आणि योग्य ते स्पष्टीकरण देण्यात येईल, असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं. हा व्हायरल फोटो आणि व्हिडिओची यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे 50 हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;